- New product
Prasannta Se Haste Hue Jio
आपल्या विजयावर आपलाच ठाम विश्वास असायला हवा. आपल्या शक्तींवर विश्वास असासयला हवा. आपण आत्मविश्वासाशिवाय कधीही प्रगती करू शकत नाही. आपले यश आपल्या विश्वासाच्या पुढे जाऊ शकत नाही. आपण आपल्याच सकुंचित विचारांच्या सीमांमध्ये अडकून पडतो. या सीमा ओलांडून आपण विश्वासाच्या राज्यात पदार्पण करीत नाही तोपर्यंत विजयाचे, यशाचे स्वप्न सत्यात उतरवू शकत नाही. तुमच्या विश्वासानुसारच तुम्हे जीवन असते. तुम्ही तुमच्या जीवनाकडे आशा आणि उत्साहाने बघायला हवे, तसेच तुमच्या शक्तींवर आणि सामर्थ्यावर तुम्हा विश्वास असायला हवा, हाच आपले जगणे यशस्वी होण्याचा महामार्ग आहे. विश्वासामुळेच आपल्याला खर्या अर्थाने जीवन के. जिथून जीवनाचा प्रवाह वाहायला सुरूवात होते त्या शक्तीची प्रवेशद्वारे उघडण्याचे काम विश्वास करीत असतो. कोणत्याही माणसात असलेल्या विश्वासावरूनच आपण त्याचे यश मोजू शकतो. आशादायक क्षणी जे दिसते, तेच खरे माणसाचे रूप असते.
You might also like
No Reviews found.